दर कोसळले! मोठ्या कष्टाने फुलविलेल्या झेंडूने बळीराजाला रडविले…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-  यंदा झेंडूची फुलांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे, त्याचा परिणाम भावांवर झाला असून, बुधवारी 40 रुपये किलोने असलेले भाव, गुरुवारी पडले,10 रुपये किलो अशा मातीमोल भावात झेंडूचे भाव झाल्याने खरेदीदार खुश आहे,

तर भावात झालेली घसरण पाहून उत्पादक मात्र निराश झाले आहे. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला फुलांच्या मागणीत वाढ झाली आणि फुलांना चांगला भाव मिळाला.

त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळाला. दिवाळीतही फुलांना चांगला भाव मिळेल या उद्देशाने लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी झेंडूसह विविध फुलांची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली.

परिणामी झेंडू, शेवंती आदी महत्त्वाच्या फुलांचे भाव गडगडले. गेल्या वर्षी दिवाळीत झेंडू 100 रुपये प्रतिकिलोने विकला गेला होता.

यंदा घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू 20 ते 25, तर लहान आकाराचा झेंडू 10 तर 15 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.

एरव्ही शंभरी पार असणारी शेवंती बुधवारी 40 रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होती. ‘फुलांना दर कमी मिळाल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe