Ration Card News : देशातील गरीब नागरिकांना कमी दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून कुटुंबातील सदस्यांप्रती कमी दरात धान्य वाटप केले जाते. याचा फायदा देशातील करोडो गरीब कुटुंबाना होत आहे.
कोरोना काळापासून केंद्र सरकारने देशातील रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे याचा फायदा लाखो रेशन कार्ड धारकांना होत असल्याचे दिसत आहे.
आता सरकारकडून पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता रेशनसोबत साखर देखील मिळणार आहे. दिल्ली सरकारकडून दिल्लीतील गरजू कुटूंबांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारकडून वंचित कुटुंबांच्या अडचणी कमी करण्यासाठी आणि सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने गरिबांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड धारकांना लवकरच स्वस्त धान्यासोबत साखर देखील मिळणार आहे.
दिल्ली सरकारकडून मोफत साखर वाटप घेण्यात आलेल्या या निर्णयाचा 2 लाख 80 हजार लोकांना फायदा होणार आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि गरजू कुटूंबांना मोठा फायदा होणार आहे.
आता साखर १ रुपयाला मिळणार आहे
केंद्राद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सर्व NFSA लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ सोबत मोफत अन्नधान्याव्यतिरिक्त, दिल्ली सरकारने अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांना साखर अनुदान अंतर्गत मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
AAY कार्डधारकांना साखरेचे वितरण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आता दिल्लीतील रेशनकार्ड धारक १ रुपयांमध्ये साखरेचा लाभ घेऊ शकतात.
दिल्ली सरकारकडून राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबाना अंत्योदय अन्न योजना श्रेणी कार्डधारकांना 1 किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड धारक स्वस्तात साखरेचा लाभ घेऊ शकतात.