Retirement Age Hike : अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याच कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच सेवानिवृत्तीच्या वयात 3 वर्षांची वाढ होणार आहे.
याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 65 वर्षे केले जाणार आहे. इतकेच नाही तर आता कर्मचाऱ्यांना VRS ही घेता येणार आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. याला मंजुरी मिळताच निवृत्तीचे वय वाढवले जाईल.
उत्तर प्रदेश सरकारकडून वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संवर्गातील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 3 वर्षांनी वाढणार होणार असून आता ते 62 वरून 65 वर्षे इतके होणार आहे. निवृत्तीचे वय वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. इतकेच नव्हे तर निवृत्तीचे वय वाढवून आणखी एक प्रस्ताव तयार केला आहे. ज्या अंतर्गत डॉक्टर स्वतःच्या इच्छेनुसार VRS घेता येणार आहे.
राज्यात प्रादेशिक वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संवर्गातील डॉक्टरांची एकूण 6000 पदे रिक्त असून साध्य ही पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचे निवृत्तीचे वय 62 वरून 65 वर्षे करण्यासाठी आरोग्य विभागाकडून मसुदा तयार करण्यात आला आहे. तसेच नवीन नियमांच्या मसुद्यात अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्यात अशी व्यवस्था केली आहे की, 62 वर्षे वयोमर्यादेपर्यंत डॉक्टर प्रशासकीय पदावर कार्यरत राहतील. परंतु त्यानंतर ते फक्त ३ वर्षे रुग्णांवर उपचार करणार आहेत.
घेता येणार स्वेच्छानिवृत्ती
महासंचालकांसारख्या पदावर कार्यरत असणारे डॉक्टर आणि 62 वर्षांनंतर रुग्णांच्या उपचारात सहभागी होऊ न इच्छिणाऱ्या डॉक्टरांना स्वेच्छानिवृत्ती घेता येणार आहे, असेही या प्रस्तावात ठेवले आहे. त्यामुळं त्यांना व्हीआरएस देण्यावर कोणतेही बंधन घातले जाणार नाही.
वेतन
राज्यातील डॉक्टरांचा अभिप्राय, व्यवस्था तसेच इतर राज्यांचे मूल्यमापन घेऊन हा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच वयाच्या 62 व्या वर्षी निवृत्त होणारे डॉक्टर त्यांच्या इच्छेनुसार 3 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती घेऊन रुग्णांची सेवा करता येणार आहे.
या बदल्यात त्यांना शेवटच्या वेतनाएवढे वेतन देण्यात येईल. परंतु या पेमेंटमध्ये पेन्शनची रक्कम कमी देण्यात आली आहे. वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त होणार्यांनाही पुढच्या 3 वर्षे पुनर्नियुक्तीसह रुग्णांची सेवा करता येणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यानंतर त्याला मंजुरी मिळताच निवृत्तीचे वय वाढवण्यात येईल.