Ration Card : कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना (Ration card holders) सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकाकडून (Central Goverment) शिधापत्रिकेबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत. सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते.
तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही तुमचे रेशन कार्ड आजपर्यंत आधारशी लिंक केले नसेल तर त्वरा करा. रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की शिधापत्रिका आधारशी जोडण्याची अंतिम तारीख आधी 31 मार्च होती, परंतु केंद्र सरकारने लाभार्थ्यांना मोठी संधी देत ती 30 जूनपर्यंत वाढवली. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने (Department of Food and Public Distribution) अधिसूचना जारी करून ही माहिती दिली होती.
रेशन कार्ड आधारशी लिंक (Link to Ration Card Aadhaar) करणे अनिवार्य
शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून कमी किमतीत रेशन मिळते हे लक्षात घेण्यासारखे आहे. केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना लाभ मिळत आहे.
शिधापत्रिकेचे इतरही अनेक फायदे आहेत. रेशनकार्डशी आधार कार्ड लिंक करून तुम्ही ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील रेशनकार्ड दुकानातून रेशन मिळवू शकता.
आधार कार्ड ऑनलाइन कसे लिंक करावे?
- प्रथम तुम्ही आधारच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
- आता ‘Start Now’ वर क्लिक करा.
- आता तुमचा पत्ता जिल्हा राज्य भरा.
- आता ‘रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- तुम्ही OTP टाकताच, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
ऑफलाइन लिंक कसे करावे
याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑफलाइन सुद्धा आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करू शकता. यासाठी तुमची आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्डची प्रत, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो घ्या आणि रेशनकार्ड केंद्रावर जमा करा.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचे आधार कार्ड बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन रेशनकार्ड केंद्रावरही करून घेऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही ते 30 जूनपूर्वी करणे आवश्यक आहे.