Bank Lockers New Rules : आरबीआयने केला बँक लॉकर्सच्या नियमांत मोठा बदल, लगेच चेक करा

Published on -

Bank Lockers New Rules : जर तुमचे बँक लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण रिझर्व्ह बॅंकेने बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने बँकासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांमधील या बदलांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्वरित नवीन मार्गदर्शक तत्त्वे तपासा.

बँक लॉकरचे नियम माहित असणे गरजेचे

लॉकरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही जबाबदार नसल्याचं अनेकदा बँका ग्राहकांना सांगून चोरीच्या घटनांमधून स्वतःची सुटका करून घेतात. त्यामुळे त्या ग्राहकांना कायदेशीर लढाई लढावी लागते.

जानेवारी 2022 नंतर, बँक लॉकरमधून त्या वस्तूचे नुकसान झाले तर बँका त्यांच्या दायित्वातून सुटू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला बँक लॉकरचे नियम माहित असणे गरजेचे आहे.

आता बँकेलाच भरपाई द्यावी लागणार

RBI ने बँक लॉकरबाबत नवीन नियम लागू केला असून त्यामध्ये असे म्हटले आहे की लॉकरमधून कोणतीही वस्तू चोरीला गेली तर बँकेला ग्राहकाला झालेल्या नुकसानीच्या 100 पट नुकसान भरपाई द्यावी लागेल. बँक लॉकरमधील चोरीच्या तक्रारीमुळे हा नियम जारी केला आहे.

रिकाम्या लॉकर्सचीही माहिती द्यावी लागणार

सार्वजनिक क्षेत्राच्या विभागांमध्ये पारदर्शकतेचा अभाव हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला असून आजपर्यंत बँका या चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष करत होत्या त्यामुळे आरबीआयने म्हटले आहे की, बँकांना आता रिकाम्या लॉकरची यादी त्यासोबतच लॉकरचा प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करणे बंधनकारक असणार आहे.

जाणून घ्या लॉकर भाड्याने देण्याचे काही महत्त्वाचे नियम

जेव्हा तुम्ही एखाद्या लॉकरमध्ये प्रवेश कराल तेव्हा बँकेकडून तुम्हाला ई-मेल आणि एसएमएसद्वारे सावध केले जाईल. वाढती फसवणूक रोखण्यासाठीच हा नियम केला आहे.

लॉकर केवळ तीन वर्षांसाठी भाड्याने देण्याचा अधिकार बँकेला आहे. म्हणजेच एखाद्या लॉकरचे भाडे रु. 2000 असेल तर, बँकेने इतर देखभाल शुल्क वगळून ग्राहकांकडून रु. 6000 पेक्षा जास्त शुल्क घेऊ नये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News