RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank) परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळे या बॅंकेच्या ठेवीदार (Depositors) आणि खातेधारकांना (Account holders) मोठाच धक्का बसणार आहे.
बॅंकेच्या आर्थिक स्थितीमुळे (Financial status) हा निर्णय घेतला आहे येत्या 22 सप्टेंबर 2022 पासून हा आदेश लागू होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court)12 सप्टेंबर 2017 च्या आदेशानुसार पुणेस्थित रुपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द (License revoked) करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये रिट याचिका 2014 च्या 2938, 2017 च्या रिट याचिका क्रमांक 9286 साठी आदेश जारी केले होते.
या आदेशानंतरच आरबीआयने कारवाई सुरू केली आणि 22 सप्टेंबरपासून बँकेचे (Bank) कामकाज बंद करण्याचे आदेश जारी केले.
आरबीआयचे म्हणणे आहे की यापूर्वी महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांनीही बँक बंद करण्याचे आवाहन केले होते. 26 ऑगस्ट 2022 रोजी आरबीआयने सांगितले होते की बँकेची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली आहे.
मात्र, 21 फेब्रुवारी 2013 रोजी बंद होणाऱ्या बँकांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला. आरबीआयने त्याच दिवशी केरळच्या थोडुपुझा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले होते.