अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- आपल्या कीर्तनाने राज्यात ख्याती मिळवलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे.
नुकतीच इंदोरीकर महाराजांविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं दिलासा दिला होता.

कारवाईच्या फेऱ्यातून सुटका झालेले महाराज निवांत होण्याच्या आधीच पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. इंदोरीकर महाराजांविरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 8 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता.
त्यानंतर आता अंनिसने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत अंनिसने इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केलंय. अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ही माहिती दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|