Permission For Pets : कुत्रा, मांजर पाळण्याआधी ही माहिती वाचाच ! कारवाई होण्याची शक्यता…

Ahmednagarlive24 office
Published:
Permission For Pets

Permission For Pets : घरात कुत्रा अथवा मांजर पाळण्यासाठी परवाना (पेट लायसन्स) असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र, या नियमांबाबत शहरातील नागरिक अनभिज्ञ असल्याने मनपाकडे एकाही पाळीव प्राण्याची नोंद नाही. परवाना नसेल तर मालकाला दंड आकारण्याची तरतूद आहे.

महापालिका कायद्यातील कलम १४-२२ (अ) उपकलम ३८६ नुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरी अथवा अपार्टमेंटमध्ये कोणताही प्राणी पाळायचा असेल, तर त्या प्राण्याची नोंदणी मनपाच्या आरोग्य अथवा कोंडवाडा विभागाकडे करणे बंधनकारक आहे. पाळीव प्राण्यांची नोंदणी व परवान्याचे नूतनीकरण करताना संबंधित प्राण्याच्या लसीकरणाचा पुरावा सादर करावा लागतो.

शहरात बहुतांशी जणांकडे पाळीव कुठे आहे तर काहींकडे मांजरही आहे. मात्र, पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करावे लागते. परंतु प्राणी पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, याचीच कल्पना बहुसंख्य प्राणी प्रेमींना नाही. त्यामुळे परवान्यासाठी मनपाकडे अर्जच येत नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात पाळीव कुत्र्यांच्या परवानगीबाबत नागरिकांची उदासीनता दिसून येते तर मोकाट कुत्र्यांबाबत मनपाची उदासीनता दिसून येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत मोकाट कुत्र्यांची मोठी संख्या वाढली आहे. मात्र सध्या मनपाकडे कुत्रे पकडणारी कुठलीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

पाळीव प्राण्यांबाबत मनपाकडून रीतसर परवानगी घेतली नाही तर, दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, मनपाकडून अशा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अथवा परवाना घेण्याबाबत आवाहनही केले जात नसल्याने परवाना घेण्याबाबत उदासीनता दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe