Realme GT Neo 5 : शक्तिशाली प्रोसेसर असलेला रिलायमीचा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच,लॉन्चपूर्वी लीक झाली माहिती

Updated on -

Realme GT Neo 5 : जर तुम्ही रिलायमीचे चाहते असाल तर तुमक्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी लवकरच शक्तिशाली प्रोसेसर असलेला नवीन स्मार्टफोन लॉंच करणार आहे.

कंपनी आपला आगामी Realme GT Neo 5 हा स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही नाइन स्मार्टफोन वक्त घेणार असाल तर थोडे थांबा, लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येत आहे.

अशी मिळतील फीचर्स

हा नवीन फोन RMX3708 मॉडेल नंबर सह Geekbench वर लिस्ट केला आहे. हा मॉडेल नंबर पूर्वी ऑनलाइन समोर आलेल्या TENAA प्रमाणन वेबसाइट सूचीनुसार Realme GT Neo 5 शी जोडलेला असून गीकबेंच सूचीनुसार, तो Android 13 वर चालेल आणि ‘taro’ कोडनेम असलेल्या ऑक्टा-कोर चिपसेटद्वारे समर्थित असणार आहे.

या प्रोसेसरला एक कोर 3.0GHz, तीन 2.50GHz कोर आणि 1.79GHz वर क्लॉक केलेले चार कोर समर्थित आहेत, जे Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटची पुष्टी करते. तसेच लिस्टिंगनुसार, या नवीन फोनमध्ये 16 GB रॅम मिळू शकते.

दमदार असणार कॅमेरा

यामध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तो डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप फोनमध्ये उपलब्ध असणार आहेत.

कॅमेरा बाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी IMX90 प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच 16-मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाऊ शकतो.

मिळणार फास्ट चार्जिंग सपोर्ट

हा 240W फास्ट चार्जिंग सह ऑफर केला जाणार असल्याचा दावा आहे. यामध्ये 240W फास्ट चार्जिंगसह 4,600mAh बॅटरी आहे आणि हा फोन सध्याचा सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन आहे. हा फोन 20 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

लीकनुसार, यात 13 इनबिल्ट तापमान सेन्सर असू शकतो. तसेच PS3 फायर प्रोटेक्शन डिझाइन उपलब्ध असणार आहे. 240W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान ड्युअल GaN मिनी चार्जिंग अॅडॉप्टरसह येणार आहे. यात, एक 12A चार्जिंग केबल उपलब्ध होईल जी 21AWG पातळ असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News