Jio Recharge Plan : जिओ ही कंपनी भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे अनेक ग्राहक आहेत. कंपनी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत असते. यापैकी काही प्लॅन्सच्या किमती खूप जास्त आहेत तर काही प्लॅन्सच्या किमती खूप कमी आहेत.
जर तुम्हाला एकदा रिचार्ज करून टेन्शन फ्री राहायचे असेल तर तुमच्यासाठी कंपनीकडे चांगले प्लॅन आहेत. तसेच कंपनी या प्लॅनमध्ये विनामूल्य Netflix-Amazon सदस्यत्वासह अनेक फायदे मिळत आहेत. कंपनीचे हे प्लॅन कोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
तुम्ही जर Jio चे ग्राहक असाल तर तुम्ही एकदा रिचार्ज करून टेन्शन फ्री राहू शकता. असे कंपनीचे 365 दिवसांच्या तीन प्लॅन आहेत, ज्यात तुम्हाला कमी किमतीत कॉलिंग, डेटा तसेच OTT फायदे मिळतील.
2545 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 2545 रुपयांच्या प्लॅनची वैधता 1 वर्ष म्हणजेच 365 दिवसांची आहे. यात ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS ची सुविधा दिली जाते. यामध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही कंपनी देत आहे.
2897 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 2897 रुपयांच्या प्लॅनची वैधता 1 वर्ष म्हणजेच 365 दिवसांची आहे. यात दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल.
2999 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनची किंमत 2999 रुपये इतकी आहे, यादेखील प्लॅनची वैधता 1 वर्ष आहे. यात दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. तसेच काही ट्रेंडिंग ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जाते.