Jio Yearly Plan : दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खूप कमी काळात देशात मोठा ग्राहकावर्ग तयार केला आहे. कित्येक जण जिओचीच सेवा वापरत आहेत. जिओकडे वेगवेगळे डेटा,वैधता आणि किंमत श्रेणींमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत.
त्यामुळे ग्राहक त्यांच्या बजेटनुसार रिचार्ज करू शकतात. कंपनीचे रिचार्ज प्लॅन कमी किमतीत जास्त फायदे देतात. कंपनीकडे वर्षभराची मुदत असणारे काही रिचार्ज प्लॅन आहेत. यात ग्राहकांना डेटासह अनेक फायदे मिळत आहेत. पाहुयात हे प्लॅन्सची माहिती सविस्तर.

Jio चा सर्वात स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅन
शक्यतो, टेलिकॉम कंपन्या 1 महिन्यासाठी किमान 349 रुपयांचे प्लॅन ऑफर करतात, ज्यात डेटाचे जास्त फायदे मिळत नाहीत. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जास्त डेटा हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही Jio चा स्पेशल रिचार्ज प्लॅन निवडू शकता, ज्याची किंमत मासिक किंमतीनुसार केवळ 232 रुपये असू शकते.
जिओचा वार्षिक प्लॅन
कंपनीद्वारे 2,999 रुपयांमध्ये परवडणारा वार्षिक सुट्टी प्लॅन ऑफर केला जातो. या रिचार्ज प्लॅनद्वारे तुम्ही प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकता. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात डेटा, कॉलिंगसह OTT फायदे मिळत आहेत.
प्रीपेड प्लॅन
कंपनीकडून 2,999 रुपयांचा हा वार्षिक रिचार्ज पॅक अधिक दिवसांच्या वैधतेसह येतो. यात यूजर्सना प्लॅनच्या सुविधेचा लाभ 365 दिवस नाही तर 388 दिवसांसाठी मिळतो.
फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात, दररोज 2.5 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जात आहेत. तसेच, Jio अॅप्ससह इतर अनेक OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.