अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उत्पादन मिळविण्याची मेहनत वाया गेली गेली.पण त्यावर मात करत नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे. वाढत्या उन्हाळ्यात कलिंगड उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत.
उन्हाळ्यामध्ये कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय दरही सरासरीपेक्षा अधिकचे मिळत आहे. मारोती पाटलांनी 2 एकरात 60 टन उत्पादन घेतले आहे.
पाटलांचे कलिंगड दर्जेदार असल्यामुळे व्यापारी थेट बांधावर येऊन कलिंगडची खरेदी करीत आहे. त्यामुळे त्याचा वाहतूकीचा खर्च तर टळला आहेच.
पण यंदा कलिंगडाला विक्रमी दरही मिळत आहे. हे पीक 70 दिवसांमध्ये पदरात पडते.यंदा कलिंगडाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने या दर वाढीचा मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सध्या कलिंगड हे 12 ते 14 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. तर शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा यंदा अधिकचा दर मिळत आहे.मारोती पाटील कलिंगडाचे कीड-रोगराईपासून संरक्षण व्हावे याकरिता प्लॅस्टिकचे कपड्याचे अच्छादन करून घेतले.
पाण्याचे योग्य नियोजन केले त्यामुळे त्यांना कलिंगडातून भरघोस उत्पादना बरोबर भरघोस नफा देखील मिळात आहे.