Redmi A1 Plus : उद्या लॉन्च होणार शक्तिशाली Redmi A1 Plus, जाणून घ्या किंमतीसह लीक फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

Redmi A1 Plus : Redmi ने आपला एंट्री लेव्हल स्मार्टफोन Redmi A1 Plus लॉन्च (Launch) करण्याची घोषणा (Declaration) केली आहे. कंपनी हा फोन भारतात 14 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. कंपनीने या आगामी फोनच्या काही फीचर्स (Features) आणि डिझाइनबद्दल माहिती दिली आहे.

कंपनीचा लॉन्च इव्हेंट अधिकृत YouTube पेज आणि सोशल मीडिया चॅनलवर थेट केला जाईल. Xiaomi वेबसाइटवर जारी केलेल्या मायक्रोसाइटनुसार, Redmi A1 Plus ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक या तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर केला जाईल.

फोनबद्दल काही माहितीची पुष्टी झाली आहे, आणि असे कळले आहे की फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाईल. या फोनमध्ये 6.52-इंचाचा एलसीडी डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे, जो 1600×700 पिक्सेलसह येऊ शकतो. हा फोन रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो.

पॉवरसाठी, Redmi A1 Plus मध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 10W चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन Android 12 वर काम करेल असे बोलले जात आहे.

हा फोन MediaTek HelioA22 चिपसेट सह येईल अशी अपेक्षा आहे, आणि यात 3 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा म्हणून, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, जो 8 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

किंमत (Price)

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, लीक फीचर्स पाहता, Redmi A1 Plus हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल आणि त्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल. MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, Redmi A1 Plus ची किंमत 6,499 ते 7,499 रुपयांदरम्यान असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe