Redmi Smart Fire TV 4K : रेडमीचा नवीन 43 इंच टीव्ही खूप स्वस्तात खरेदी करण्याची संधी! पहा संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Redmi Smart Fire TV 4K

Redmi Smart Fire TV 4K : जर तुम्ही स्वस्तात आणि लोकप्रिय कंपनीचा स्मार्ट टीव्ही खरेदी इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही नुकताच लाँच झालेला रेडमीचा Redmi Smart Fire TV 4K हा टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

तुमच्यासाठी अशी शानदार ऑफर Mi.com आणि Amazon वर सुरु आहे. यात कंपनीकडून जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा टीव्ही तुमच्या घरी न्या. जाणून घ्या Redmi Smart Fire TV 4K ची किंमत आणि ऑफर.

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

किमतीचा विचार केला तर या टीव्हीची किंमत 26,999 रुपये इतकी आहे, परंतु विशेष लॉन्च ऑफर अंतर्गत कंपनीकडून हा फोन सध्या 24,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही तो Mi.com आणि Amazon वरून खरेदी करू शकता. तसेच कंपनी ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि EMI व्यवहारांची निवड करणाऱ्यांसाठी 1,500 रुपयांपर्यंत झटपट सवलत देखील देत आहे.

डिस्प्ले आणि साउंड

नवीन Redmi Smart Fire TV 4K मध्ये 43-इंचाचा स्क्रीन आकार असून यामध्ये 3840×2160 पिक्सेलचा 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. तुम्हाला याच्या डिस्प्लेमध्ये 60 Hz रिफ्रेश रेट, HDR सपोर्ट आणि विविड पिक्चर इंजिनचा सपोर्ट पाहायला मिळेल. या स्मार्ट टीव्हीमध्ये मेटल बेझल-लेस डिझाइन आहे. इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवासाठी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ, डीटीएस व्हर्च्युअल:एक्स आणि डीटीएस:एचडी सोबत 24W ड्युअल स्टीरिओ स्पीकर सिस्टम दिली आहे.

स्टोरेज

नवीन स्मार्ट टीव्ही क्वाड-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित असून तो 2GB रॅम आणि 8GB स्टोरेजसह येतो. हा शानदार टीव्ही 12,000 अॅप्स असणारे अॅप स्टोअर, अंगभूत व्हॉइस असिस्टंट आणि पालक नियंत्रणासारख्या फीचर्ससह फायरओएसवर टीव्ही चालतो.

यात पिक्चर-इन-पिक्चर मोड दिला आहे. तो अलेक्सा व्हॉइस असिस्टंटलाही सपोर्ट करतो.इतकेच नाही तर हा टीव्ही प्राइम व्हिडिओ, अॅमेझॉन म्युझिक आणि नेटफ्लिक्ससाठी समर्पित हॉटकीजसह हा बंडल केलेल्या मिनिमलिस्टिक रिमोटसह येतो.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

कंपनीने कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये Miracast आणि AirPlay 2 सारखी शानदार फीचर्स दिली आहेत. यात गेमिंगसाठी ऑटो-लो लेटन्सी मोड दिले आहे. तसेच या टीव्हीमध्ये ड्युअल-बँड वायफाय, तीन एचडीएमआय 2.1 पोर्ट, ब्लूटूथ 5.0, दोन यूएसबी पोर्ट, एक इथरनेट पोर्ट आणि एक हेडफोन जॅक दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe