Redmi Note 12 5G : 200MP कॅमेरा असणाऱ्या रेडमीच्या 5G फोनवर मिळतेय भरघोस सवलत, पहा किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Redmi Note 12 5G : रेडमीच्या Redmi Note 12 5G या सिरीजची पहिली विक्री आजपासून सुरु होत आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही तो दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करू शकता.

यावर वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी यात 200MP चा जबरदस्त कॅमेरा देत आहे. त्यामुळे स्वस्तात भन्नाट आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन विकत घेण्याची संधी चुकवू नका.

Redmi Note 12 फीचर आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देत असून तो डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची शिखर ब्राइटनेस पातळी 1200 निट्स आहे.

तसेच फोटोग्राफीसाठी कंपनीकडून यामध्ये 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. बॅटरी 5000mAh आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 12 Pro 5G फीचर आणि स्पेसिफिकेशन

8 GB पर्यंत LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज यामध्ये कंपनीकडून देण्यात आले आहे. प्रोसेसर म्हणून, यात MediaTek Dimensity 1080 चिपसेट आहे. फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी OIS सह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे.

तर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. हा फोन 6.67-इंचाच्या AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. बॅटरी 5000mAh आहे, जी 67W चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 12 Pro Plus 5G फीचर आणि स्पेसिफिकेशन

या सिरीजमधील हा टॉप-एंड स्मार्टफोन असून कंपनीकडून त्यात 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज दिले जात आहे. हा फोन MediaTek Dimension 1080 प्रोसेसरवरही काम करतो.

तसेच 6.67-इंचाचा प्रो AMOLED डिस्प्ले असून डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे. तर फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 200-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. हा फोन 4980mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 120W चार्जिंगला सपोर्ट करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe