Instagram : इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम नवनवीन फीचर्स आणत असते. भारतात टिकटॉक बंद झाल्यापासून इंस्टाग्रामवर रील्सला प्रचंड पसंती मिळाली आहे.
रील्समुळे केवळ मनोरंजनच नाही तर पैसेही कमावत येतात. आता हेच रील्स वापरकर्त्यांना 3D अवतारामध्ये बनवता येणार आहे. हा अवतार कसा वापरायचा ते जाणून घ्या.
या स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: सर्वात प्रथम इंस्टाग्राम या अॅपवर जा. अॅपवर डावीकडे स्वाइप करून रील्स या टॅबवर जा.
स्टेप 2: तेथे तुमची रील रेकॉर्ड करा. डाउनलोड करताना स्टिकर्स या बटणावर क्लिक करा.
स्टेप 3: त्यानंतर तेथे अवतार पर्यायावर क्लिक करून तुमच्या आवडीचा अवतार निवडा.
स्टेप 4: रील डाउनलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: सगळ्यात शेवट caption देऊन तुमच्या यादीतील लोकांना टॅग करा. त्यानंतर शेअर निवडा.
काही दिवसांपासून मेटा नवनवीन फीचर्सवर काम करत असून लवकरच किशोरवयीन मुलांसाठी एक जबरदस्त फीचर सुरू करणार आहे. या नवीन फीचर्समध्ये या मुलांना त्यांचे प्रोफाइल त्यांच्या मित्रांच्या यादीपर्यंत मर्यादित करता येणार आहे.
विशेष म्हणजे त्यांचे पेज किंवा पोस्ट कोण पाहू आणि लाईक करू शकणार हे ठरवता येणार आहे. त्याचबरोबर या किशोरवयीन मुलांचे पोर्नोग्राफिक व्हिडिओ आणि फोटोंपासून रक्षण होईल.