दारू पाजण्यास नकार, एकावर चॉपरने वार

Published on -

Ahmednagar News : दारू पाजण्यास नकार दिल्याने एकास गळ्यावर चाकूने तसेच डोक्‍यात चॉपरने तार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला आहे. विजय भनगाडे (रा.भोरीचाळ, रेल्वे स्टेशनरोड, अहमदनगर) असे ताब्यात घेतेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती अशी की, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना आरोपी भनगाडे विजय भनगाडे हा त्याचे राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार पो.नि.यादव यांनी आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,

पोलीस कर्मचारी मनोज कचरे, गणेश धोत्रे, शरद बाघ, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजव हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!