रेखा जरे हत्याकांड: आरोपी भिंगारदिवेच्या जामिनावर काय झाला युक्तिवाद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे (रा. केडगाव) याच्या नियमित जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद कुतर्डीकर यांनी जामिनाबाबतचा निर्णय राखीव ठेवला आहे.(Rekha Jare Murder Case) 

भिंगारदिवे याच्या वतीने ऍड. विपूल दुशिंग आणि ऍड. संजय दुशिंग यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले आहे.

खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला कधी सुरूवात होईल, हे सांगता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जामीन द्यावा, असे म्हणणे सादर करण्यात आले. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी या जामीन अर्जावर लेखी स्वरुपात यापूर्वीच म्हणणे सादर केलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News