अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलखान्यावर सोनई पोलिसांनी छापा टाकून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून १० जनावरांची सुटका करण्यात आली.
जनावरांना मढी येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे.तर याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी,
चांदा येथील शास्त्रीनगर गाढवे वस्तीजवळ एका टेम्पोत काही जनावरे भरुन औरंगाबाद येथील कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे सोनई पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलाअसता . त्या ठिकाणी १ लाख ५३ हजार रुपये किंमतीची १० जनावरे व ४ लाख ५० हजार रुपयाचा अशोक लेलॅर्डचा टेम्पो (क्र. एम एच २० ई एल ७८३३) असा एकूण ६ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर पसार झालेला जनावरांचा मालक अताऊला शब्बीर पठाण (रा. चांदा, ता. नेवासा) व टेम्पोवरील अज्ञात चालक याच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम