Reliance Jio Offers : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या ऑफर प्लॅन सादर करत असते. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 395 रुपयांचा प्लॅनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून बंपर सुविधा ऑफर केले जात आहे. चला तर जाणून घेऊया या जबरदस्त प्लॅनबद्दल सर्वकाही. या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची अमर्यादित सेवा, डेटा आणि OTT फायदे. चला जाणून घेऊया 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणते फायदे दिले आहेत.
जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते. जर तुम्ही दीर्घ वैधता योजना शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्याने सुमारे 3 महिन्यांचा त्रास संपेल.
रिलायन्स जिओच्या या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 6GB डेटा दिला जातो. यामध्ये उपलब्ध असलेला हाय स्पीड 6 जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड मर्यादा 64 केबीपीएसवर येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो.
तसेच, प्लॅनमध्ये ग्राहकांना 1000 एसएमएस मिळतात. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना जिओच्या ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर एक्सेस उपलब्ध आहे.जिओचा हा 395 रुपयांचा प्लॅन ऑनलाइन रिचार्ज केला जाऊ शकतो. यासोबतच हा प्लान MyJio अॅपवरही उपलब्ध असेल. Jio 395 योजना व्हॅल्यू पॅक श्रेणी अंतर्गत सूचीबद्ध आहे.
हे पण वाचा :- Winter Tips : भारीच..! आता बिंदास चालवा हिटर-गिझर; वीज बिलात होणार मोठी कपात ; जाणून घ्या कसा होणार फायदा