अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- प्रत्येक गावातील धार्मिक स्थळांमुळे गावाच्या विकासाला हातभार लागतो. धार्मिक स्थळे ग्रामीण संस्कृतीचा कणा असतात. आगडगावमध्ये भैरवनाथ देवस्थानामुळे चांगला विकास झाला.
विश्वस्त मंडळानेही सचोटीने, पारदर्शकपणे काम केले. वर्षभरात झालेल्या कामाचा हिशोब मांडणे या पद्धतीचे अनुकरणीय आहे. असे मत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर तालुक्यातील आगडगाव देवस्थान, ग्रामस्थ व पंचक्रोशिच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, की ग्रामस्थांच्या एकीतून स्थापन झालेले हे देवस्थान एक आदर्श ठरले आहे. प्रत्येक पाच वर्षांनी ग्रामसभेतून विश्वस्तांची निवड होते, ही पद्धत एकमेव आहे.
देवस्थानाच्या माध्यमातून गावाचा चांगला विकास होत आहे. देशातूनच नव्हे, परदेशातूनही नागरिक येत आहे, ही मोठी उपलब्धी आहे.. या वेळी पंचक्रोशितील तसेच नगर महाराष्ट्रातून तसेच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथून आलेले भाविक उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम