आयुष्यात खालील चार सूत्रे लक्षात ठेवा ; पती-पत्नीचे नाते राहील आनंदी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  आपला नवरा सर्वोत्तम असावा, खूप प्रेम करणारा असावा अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते. तो प्रामाणिक, खूप प्रेमळ, मायाळू जीवाला जीव देणारा आणि सतत काळजी घेणारा असावा अशी स्त्रीची अपेक्षा आसते.

ही अपेक्षा चुकीची सुद्धा नाही, जर बायको खरंच आपल्या पतीवर नितांत प्रेम करत असेल आणि त्याबदल्यात आपल्या नवऱ्याकडून ती जास्त प्रेमाची अपेक्षा करत असले तर त्यात वावगं काही नाही. नवरा जेवढा चांगला असेल तितका संसार अधिक खुलतो.

कारण नवरा चांगला असेल तर तो बायकोला तितकं जास्त खुश ठेवू शकतो आणि तितके दोघे खुश राहू शकतात. त्यांच्यात भांडणे कमी होतात. यासाठी नवऱ्याने काही गोष्टी लक्षात ठेवल्यास नाते नक्कीच समाधानी होईल

1. सन्मान :- जेव्हा एखाद्या जोडप्याचे नवीन लग्न होते, तेव्हा ते एकमेकांचा खूपच सन्मान करत असतात. मात्र काळाच्या ओघात किंवा कामाचा व्याप वाढल्याने त्यांना एकमेकांचा सन्मान करणे जमत नाही. अशावेळी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

मात्र जर तुम्ही तुमच्या पत्नीचा योग्य सन्मान केला, किंवा जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीपुढे आपल्या पत्नीला आदराची वागणूक दिली तर निश्चितपणे तुमची पत्नी खुश झाल्याशिवाय राहणार नाही व ती देखील तुमची काळजी घेईल व तुमचा सन्मान करील.

2. घरकामात थोडी मदत करा :- तुमची बायको घरातील सर्व काही कामे बिनबोभाट करत असते, त्याबद्दल ती कधीही तक्रार करत नाही. मग एखाद्या वेळेस जेव्हा ती जास्त दमलेली असेल त्यावेळी तुम्ही तिला घरकामात थोडी मदत करा. तुमच्या या कृतीने तुमची बायको निश्चितच खुश होईल व आपल्यालाही त्यामुळे काहीतरी काम केल्याचा आनंद मिळेल.

3. प्रशंसा करा :- तुमच्या दैनंदिन कामकाजात तुम्ही बायकोचे कौतुक करणे विसरूनच जाता. जेव्हा बायको एखादा चांगला खाद्यपदार्थ बनवते, एखादी कलाकुसरीची वस्तू बनवते, घरदार चांगले आवरते किंवा एखाद्या दिवशी बायकोने खूपच चांगला मेकअप केला असेल तर चार शब्द चांगले बोलून तिची प्रशंसा करा.

4. जबाबदारी घ्या :- जेव्हा तुमची बायको तिचं सर्वस्व सोडून तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही हेच विसरून जाता कि तुमच्या आयुष्यात येण्याअगोदर तिचेही एक कुटुंब होते. तुम्ही तुमच्या अपेक्षांच्या भावविश्वात एवढे गुंग होऊन जाता कि तुमच्या जबाबदारीच भान तुम्हाला राहात नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe