Indian Railways Rules : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण काही दिवसांपासून रेल्वेने नियमात बदल केले आहेत.
त्याचबरोबर जे प्रवासी हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर रेल्वे प्रशासन कडक कारवाई करत आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या नाहीतर तुम्हाला दंडासह तुरुंगात जावे लागेल


लक्षात ठेवा या गोष्टी
क्रमांक 1
चुकूनही रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या आवारात धूम्रपान किंवा मद्यपान करू नका. जर तुम्ही धूम्रपान करताना पकडला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला दंड किंवा 3 वर्षे तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकतो.

क्रमांक 2
जर तुम्ही रेल्वेमध्ये फटाके, पेट्रोल, केरोसीन, गॅस सिलिंडर यांसारखे ज्वलनशील पदार्थ नेत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तुम्हाला रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 164 नुसार 1,000 रुपये दंड, 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतो.

क्रमांक 3
त्याचबरोबर तुम्हाला रेल्वेमध्ये मोठ्याने बोलता येणार नाही आणि स्पीकरमध्ये संगीत ऐकू शकत नाही.जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर कलम 145 अंतर्गत कारवाई आणि GRP तुमचे चलन कापून घेऊ शकते.

क्रमांक 4
त्याशिवाय रूमही विना तिकीट प्रवास करू शकत नाही. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुमच्याकडून तिकीटाव्यतिरिक्त वेगळा दंड आकारला जाऊ शकतो.











