अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे.
सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील काँग्रेस पक्ष हा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी राज्यातील काँग्रेस संघटना या पुढील काळातही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत राहील.

असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. अहमदनगर येथे जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आ. लहु कानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रम नवले यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी व संगणकीकृत सातबारा हा महत्वकांक्षी कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी राबविण्याबाबत आघाडी सरकारचे अभिनंदन केले.
तर हा कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिल्हा किसान काँग्रेस काम करेल असा संकल्प मांडला.आमदार कानडे म्हणाले देशातील शेतकरी सध्या अनेक प्रश्नांना तोंड देत असून
देशातील शेती उत्पन्नाचे भाव स्थिर रहावे यासाठी एमएसपी मिळावी व एमएसपीला कायदेशीर आधार प्राप्त व्हावा यासाठी देशातील शेतकरी आंदोलन करत आहे.
या आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून त्या प्रश्नांची भूमिका गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा किसान काँग्रेसने काम करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम