कांदा व्यापाऱ्याचा परवाना रद्द करा, शेतकऱ्यांसह मनसेची मागणी

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राहुरी मधील वर्धमान ट्रेडिंग कंपनी मधील व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले असता आज पर्यंत ह्या व्यापाऱ्याने किती तरी गरीब शेतकऱयांची फसवणूक केली असेल अगोदरच शेतकरी अनेक संकटाशी लढून जगत आहे

त्यात आशा व्यपाऱ्यांकडून होणारी लूट म्हणजे टाळू वरचं लोणी खाण्यासारखी गत आहे.आशा भ्रष्ट व्यापारीवर चाप बसवण्यात यावा व त्यासंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवत वर्धमान ट्रेडिंग कंपनी व्यापारीचे परवाना रद्द करण्यात यावा

व त्यावर कडक कारवाही करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मनसेने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव डुक्रे यांना केली आहे.

येत्या ८ दिवसात व्यापाऱ्यांवर कारवाई व परवाना रद्द न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे .

त्याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण , शहराध्यक्ष प्रतिक विधाते , विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने , वाहतूक सेनेचे राजू आढागळे व आदी मनसैनिक उपस्तिथ होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News