अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- पिवळा धातू सुरक्षित मानला जातो यामुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. तर क्रूड, बेस मेटलसारखे जोखिमीचे धातू बुधवारच्या व्यापार सत्रात मोठ्या प्रमाणावर घसरले.
विकसित जगात चलनवाढीची चिंता, आशियातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनमुळे तेलाच्या मागणी घट होण्याच्या शक्यतेमुळे कमोडिटी मार्केट अस्थिर राहिले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने:- कालच्या व्यापारी सत्रात, जागतिक इक्विटीतील घसरण आणि चलनवाढीची चिंता यामुळे सोन्याच्या दरांना आधार मिळाला. स्पॉट गोल्डचे दर ०.०७ टक्क्यांनी वाढून १८६९.६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले.
मात्र अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या नुकत्याच झालेल्या धोरणात्मक बैठकीच्या काही मिनिटे आधी गुंतवणूकदार सावध झाले.
तथापि, अमेरिकी फेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्थिक धोरणातील कोणताही बदल केवळ कामगार बाजारात पूर्ण सुधारणा आणि चलनवाढ दीर्घकाळ राहिली तरच केला जाईल. संभाव्य चलनवाढीबाबत अंदाज वर्तवले जात असले तरीही सराफा धातूंच्या किंमती आठवड्याच्या सुरुवातीला दबावाखालीच राहिल्या. अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न कमी झाल्यामुळेडॉलरचे मूल्य घसरले. परिणामी व्याज नसलेल्या सोन्यापासून गुंतवणूकदार दूरच राहिले.
कच्चे तेल:- मागील सत्रात कच्च्या तेलाचे दर ३.२ टक्क्यांनी घसरले व ६३.४ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. चलनवाढीची चिंता आणि कोव्हिड-१९ विषाणू संक्रमित रुग्णांची आशियातील वाढती संस्ख्या यामुळे जागतिक तेल बाजारातील स्थितीवर परिणाम झाला.
कमी वापर आणि फोफावणारी साथ तसेच अनेक भागातील कठोर लॉकडाऊन यामुळे भारतातील औद्योगिक क्षेत्रातील घसरती मागणी, यामुळे तेलाच्या किंमतीसाठी मोठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली.
मात्र अमेरिकी गॅसोलाइन साठ्यातून अपेक्षेपेक्षा जास्त वापर आणि अमेरिकी क्रूड साठ्यातील अपेक्षेपेक्षा कमी वाढ यामुळे तेलाच्या किंमतीतील घसरणीला मर्यादा आल्या.
अमेरिकी एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या डेटानुसार, गॅसोलाइन साठ्यात २.० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त घसरण झाल्याने अपेक्षित ०.९ दशलक्ष बॅरल मध्ये घट झाली. तर क्रूड साठ्यात १.३ दशलक्ष बॅरलची वाढ दिसून आली.
ओपेक देशांतील अण्वस्त्रांमधील प्रगती मर्यादित ठेवण्यासाठी अमेरिका आणि इराण करारात झालेल्या घडामोडींविषयी अहवालात सूचित करण्यात आले आहे. अमेरिका आणि इराणदरम्यानचे संबंध सुधारले आणि अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवले तर ते जागतिक तेल पुरवठ्यात भर पडेल.
त्यामुळे किंमतीवर दबाव आणला जाईल. अमेरिका आणि युरोपियन अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्याने क्रूडच्या मागणीत सुधारणा होण्याच्या आशावादामुळे तेलाच्या किंमतींना आठवड्याच्या सुरुवातीला काहीसा आधार मिळाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम