अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- सोन्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एखादी गोष्ट एके दिवशी खाली येते पण दुसऱ्या दिवशी ती प्रचंड वाढलेली असते. मात्र, आज देखील सोन्याचे दर सारखेच आहेत.
महाराष्ट्रात नेमकी काय आहे सोने-चांदीची किंमत
आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोने 21 रुपयांच्या वाढीसह 48196 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले.
यापूर्वी बुधवारी सोने 48175 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरावर बंद झाले होते. जाणकारांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सोन्याच्या किमतीत आज तेजी आली आहे.
आज चांदीची किंमत 121 रुपयांनी कमी होऊन 65147 रुपये प्रति किलोग्रॅम राहिली. यापूर्वीच्या व्यवहाराच्या सत्रात चांदीचा दर 65268 रुपये प्रति किलोग्रॅम होता
गुरुवारी भारतीय सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर 49219 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 49022 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 45085 रुपये प्रति 10 ग्रॅम,
18 कॅरेट सोने 36914 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने जवळपास 28793 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम