Rohit Pawar : “भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले”

Published on -

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोल्हापूरमधील (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या (By-election) प्रचारवेळी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या काळात सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे (Congress) आमदार यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे.

कोल्हापूरमधून काँग्रेसने जयश्री जाधव (Jayshri Jadhav) यांना तिकीट दिले आहे. यांच्या प्रचारासाठी महाविकास आघडीचे नेते कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

रोहित पवार यांचीही भाजपवर टीका करत गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले.

जे लोक देवीला सोडत नाहीत त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाही, ही सर्वसामान्यांची भूमिका आहे. यापुढील काळात युवकांसाठी काम करावंच लागेल. इथल्या मुलांमध्ये क्षमता आहे, फक्त त्यांना संधी दिली पाहिजे.

कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावं यासाठी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्याकडे पाहताना इतिहासात सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे. निवडणुकीत विकासाचे मुद्दे असले पाहिजेत.

पण तुम्ही काय करताय? महिलांना कमी लेखता ही तुमची विचारसरणी. शाहुंच्या नगरीत हे विचार पटणारे आहेत का? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे. 2019 ला अपयश आले तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते की कोल्हापूरकर कधी सुधारणार नाहीत.

हे कोल्हापूरकर विसरणार नाहीत. मला वाटलं या निवडणुकीत चंद्रकांत पाटील उमेदवार असतील. दादा तुम्हीच तसं म्हणाला होता, संधी होती मग का उभे राहिले नाहीत? असा प्रश्न विचारत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेशचा निकाल तुमच्या बाजूनं लागला म्हणून तुम्ही महाराष्ट्राला वेगळ्या चष्म्यातून पाहताय. फक्त पक्षासाठी ही निवडणूक करत असाल तर निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता ईडी सर्वसामान्य लोकांच्या मागे लागणार असं मला कळाले आहे असेही रोहित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe