रोहित पवार विरोधकांवर भडकले, म्हणाले…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राज्यातील विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विविध माध्यमातून टीका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर जातीयवाद पसरवित असल्याचा आरोप केला.

त्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही उदाहरणं देत या आरोपांना दुजोरा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चांगलेच भडकले आहेत.

आमदार पवार यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता उत्तर दिलं आहे. पवार यांनी म्हटलं आहे, ‘राज्यात हातातून सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसत आहे.

म्हणूनच संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

सत्तेच्या लालसेपायी पवार यांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टानं उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत.

पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही.

शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत, असं ही पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe