Rohit Pawar : “भाजपच्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठेच नाही, नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय”

Published on -

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी #KGF2 #RRR या दाक्षिणात्य चित्रपटांचे (Movies) दाखले देत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधाला आहे.

राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापलेले दिसत आहे. आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप आणि टीका सत्र सुरु आहे.

आमदार रोहित पवार यांनी ट्विट (Tweet) करून भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘कसदार स्टारकास्ट सोबतच कथेत सामान्य माणसाचं हित दाखवण्याचा प्रयत्न असल्याने #KGF2 #RRR सारखे दाक्षिणात्य चित्रपट हिट होतायेत.

पण सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठंच दिसत नाही.उलट या नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय’ रोहित पवारांनी अशा आशयाचे ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

परिणामी भाजपचा सध्याचा चित्रपट फ्लॉप ठरतोय. म्हणूनच इतरांना तर सोडाच पण स्वतःच्याच 106 मधील बहुतांश लोकांनीही या चित्रपटाकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय.

त्यामुळं कदाचित पुढील चित्रपटात स्टारकास्ट बदललीही जाईल परंतु स्टारकास्ट बदलल्याने चित्रपट हिट होईलच असं नाही. त्यासाठी मुळातच कथेत दम आणि सामान्य माणूस नायक असावा लागतो.

पण भाजपाकडून फक्त राजकीय नाटकंच सुरूय. भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकार करायचं असेल तर यानिमित्ताने का होईना भविष्यात नायक म्हणून सामान्य माणूस आपल्या कथेत दाखवला जाईल का? हा खरा प्रश्न आहे’ असेही ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

गुजरातमधील काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेवरूनही रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. गुजरातमधील काँग्रेस जिग्नेश मेवाणी आमदार यांना एकामागोमाग एक गुन्ह्यात अटक करुन भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.

त्यांच्याकडे जातीचं बोगस नाही तर अस्सलं सर्टिफिकेट आहे, तरी त्यांनी ना जातीचं हत्यार बाहेर काढलं ना वॉशरुमला जाऊ न दिल्याची तक्रार केली. विचारधारेशी तडजोड नाही! असेही पवार यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe