Maharashtra News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार रोहित पवार यांनी कौतूक केलं आहे. फडणवीस यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याचं त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवतं,
असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली.

पवार यांनी फडणवीस यांना एक निवेदन दिले आहे. राज्यसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता राज्यसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मार्फतच भराव्यात, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी राज्याती तरुणांच्यावतीने ही मागणी केली आहे. मात्र या भेटीची माहिती देताना त्यांनी फडणवीस यांचे कौतूक केले आहे.
एवढेच नव्हे तर त्यांची थेट विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याशी बरोबरी केली आहे. फडणवीस यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते, असे पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी या एका भेटीनंतर फडणवीस यांची थेट अजितदादांच्या कार्यशैलीशी तुलना केली आहे.