Maharashtra News :राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रात्यारोप सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरूद्ध फेक नेरेटिव्ह तयार करण्यात काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम, आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार आहेत, असा उल्लेख पत्रकार परिषदेत केला होता.

त्यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांना उत्तर दिले आहे. याला उत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे, महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो..
युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच HMV म्हणजे He_is_Maharashtra’s_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत.
कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि WMV म्हणजेच We_Are_Maharashtra’s_Voice व्हावं लागणार आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.