Royal Enfield : 650 सीसी इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच होणार रॉयल एनफिल्डची नवीन बाईक, जाणून घ्या किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Royal Enfield : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात रॉयल एनफिल्डची आगामी बाईक बाजारात लाँच केली जाणार आहे. जी तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

650 सीसी इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह कंपनीकडून आगामी बाईक लाँच केली जाणार आहे. जर तुम्ही शानदार मायलेज असणारी नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असणार आहे.

नवीन डिझाईन

या नवीन बाईकमध्ये काही नवीन डिझाईनचे भाग आहेत जे आगामी हिमालयन 450 सोबत शेअर करण्यात आल्याचे दिसत आहेत. तसेच स्पॉटेड मॉडेलला रेट्रो-स्टाईल गोल आकाराचे हेडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, टेल-लाइट आणि टर्न इंडिकेटर दिले जात आहेत. नवीन Royal Enfield Interceptor Bear 650 Scrambler ला ट्रियरड्रॉप आकाराची इंधन टाकी दिली जाणार आहे.

दिले जाणार पॉवरफुल इंजिन

कंपनीकडून आगामी बाईकमध्ये एक अतिशय पॉवरफुल इंजिन देण्यात येणार आहे. हे 648 cc, एअर-/ऑइल-कूल्ड, समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित असेल. हे इंजिन 47 Bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. हे टू-इन-वन एक्झॉस्ट सेटअपसह येत असून याला मानक म्हणून ड्युअल चॅनल एबीएससह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकचा सपोर्ट दिला जात आहे. हे वायर-स्पोक युनिट्ससह येईल जे बेसी ट्यूबसह सुसज्ज असणार आहे.

किंमत

जर या बाईकच्या किमतीबाबत विचार केला तर कंपनीकडून अजूनही या बाइकची किंमत जाहीर करण्यात अली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी या बाईकला बाजारात 2 ते 2.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe