अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आरपीआयच्या वतीने स्नेहालय संचलित लालटाकी येथील बालभवन मधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, संतोष पडोळे, जावेद सय्यद, ऋषीकेश विधाते, शिवम साठे, आफताब शेख, दिनेश पाडळे, यश चाबुकस्वार, ओम भिंगारदिवे, बबलू भिंगारदिवे, सोहम भिंगारदिवे, विशाल साठे आदींसह बालभवनचे स्वयंसेवक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, सर्व समाजाला सोबत घेऊन जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात आरपीआय गवई गट संघर्ष करीत आहे. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु असून, सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पक्षाचे राजकारण व समाजकारण सुरु आहे.
सत्ताधारी भाजप सरकार हुकुमशाही व जातीयवादी प्रवृत्तीने देशाचे नुकसान करीत आहे. आजची मुले उद्याचे भविष्य असून, देशाच्या उज्वल भवितव्यासाठी मुलांमध्ये समता, बंधूता ही मुल्ये रुजवण्याची गरज आहे. गरिबी, बेकारी, शेतकर्यांचे प्रश्न ज्वलंत असताना सरकारला जातीचे राजकारण करुन आपली पोळी भाजायची आहे. जातीयवादी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved