अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- वाळूंज पारगाव मौला (ता. नगर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शाखेचे उद्घाटन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात कविता बाळासाहेब नेटके यांची सर्वानुमते महिला तालुकाध्यक्षपदी तर अजय पाखरे यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी आरपीआय आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, महादेव भिंगारदिवे, आशिष भिंगारदिवे,
आकाश बडेकर, दया गजभिये, गौतम कांबळे, विलास साळवे, शैनेश्वर पवार, राहुल विघावे, अक्षय गर्जे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, आरपीआय फक्त मागासवर्गीय समाजापुरते मर्यादीत नसून, सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे.
शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने पक्षाची वाटचाल सुरु आहे. आरपीआयमध्ये सर्वसामान्य महिला व युवकांना काम करण्याची मोठी संधी आहे. समाजात समानता प्रस्थापित करुन वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे कार्य सुरु आहे. राजकारण करताना समाजकारणला महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर यांनी राजकारणात महिलांनी आल्यास बदल घडणार आहे. पन्नास टक्के आरक्षण असताना महिलांची संख्या कमी आढळते. ज्या प्रमाणे कुटुंबाची काळजी घेऊन महिला विकासाला चालना देते त्याप्रमाणे समाजाची काळजी घेण्याचे काम महिलांकडून होणार आहे.
महिलांच्या प्रश्न व अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिलांनी रणरागिणी बनून राजकारणात येण्याचे त्यांनी आवाहन केले. नवनिर्वाचित महिला तालुकाध्यक्षा कविता नेटके सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, महिलांनी स्वत:चे असतित्व सिध्द करण्यासाठी राजकारणात येण्याची गरज आहे.
प्रवाहाबरोबर राहिल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. महिलांचे संघटन झाल्यास त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, महिलांनी आपल्या न्याय, हक्क मिळविण्यासाठी व कर्तृत्व सिध्द करण्यासाठी उंबरठा ओलांडण्याचे त्यांनी सांगितले.
पारगाव मौला येथील समाज मंदिरा समोर लावण्यात आलेल्या शाखेच्या फलकाचे अनावरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखेचे अध्यक्ष गोरख अंबरीत, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक वाघ, शाम भोसले, अनिल बर्डे, शोभा साळुंके, पोपट नेटके,
सविता कांबळे, सुरेखा नेटके, महादेव अडागळे, मारुती नेटके, राहुल नेटके, बेबी नेटके, दत्ता नेटके, ग्रामपंचायत सदस्य अमोल खेडकर, पांडुरंग पांडूळे, बापू भोसले, अर्जुन बोडखे, दिलीप बोळे, संतोष अडागळे, संजय अंबरीत, भानुदास अंबरीत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख अंबरीत यांनी केले. आभार महादेव अडागळे यांनी मानले. आरपीआय महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सिमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पारगाव मौला शाखेच्या वतीने ग्रामस्थांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम