अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- काही दिवसांपूर्वी ‘आरआरआर’ सिनेमा चा ट्रेलर रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज केव्हा होणार याची वाट प्रेक्षक खूप दिवसांपासून पाहत होते.
आता त्यांची प्रतीक्षा संपली असून, साऊथ इंडियन अभिनेता एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या रिलीजचा मुहूर्त ठरला आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथचा सुपरस्टार एनटीआर, सुपरस्टार रामचरण आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एस.एस राजमौलीचा हा बहुचर्चित सिनेमा येत्या १८ मार्चला रिलीज करण्याची आमची तयारी असून, कोरोनाचा प्रदुर्भाव पाहता हा चित्रपट येत्या २८ एप्रिललाही रिलीज होण्याची शक्यता आहे असे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या पाहवे तिकडे याच चित्रपटाचा बोलबाला चालू आहे. ज्या दिग्दर्शकाने ऐतिहासिक सिनेमा ‘बाहुबली’ बनवला आहे, त्याच एसएस राजमौलीचा हा चित्रपट आहे.
त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षाकांना मोठी प्रतीक्षा आहे. राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाने जे रेकॉर्ड बनवले आहे, ते अजूनतर कुणाला तोडता आले नाही.
त्यांचा हाच चित्रपट बाहुबलीचे रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे. बॉलिवूडमधून फक्त आलीय भटच नाही तर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणही या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. त्यामुळे या मल्टीस्टार चित्रपटाची सगळीकडे हवा आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम