अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- आमदार लहू कानडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शिक्षणासाठी अडीच कोटी निधी देण्यात आला असल्याची माहिती अशोक कानडे यांनी दिली.
ते मातुलठाण येथील शाळेत एलईएडी संचाचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,
अॅड. समीन बागवान, बाबासाहेब कोळसे, सतीश बोर्डे, उपसरपंच जयश्री बोर्डे, ग्रामसेविका साळवे, एकनाथ दरेकर, सुनील वाणी, सोमनाथ बोर्डे, संदीप गुलदगड, विजय वाणी,
दीपक कणसे, महेंद्र बोर्डे, विलास बोर्डे, पंकज पाटील, साहेबराव बोर्डे, चंद्रभान वाणी, विकास बोर्डे, संजय थोरात, विलास बोर्डे, संजय कणसे, सतीश वाणी, दत्तू पवार,
रामभाऊ चिंधे, कैलास गुलदगड, कैलास वाणी, श्रीकांत बोर्डे, शंकर बोर्डे, धनंजय बोर्डे, विलास दरेकर, किरण वाणी, मुख्याध्यापिका गाजघाट, दीपाली पंधारे, पंडित,
साईनाथ वाणी, दिलीप क्षीरसागर, रावसाहेब क्षीरसागर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात निधीची कमतरता असताना मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांत शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थी हे स्पर्धेच्या युगात मागे राहता कामा नये, या भावनेतून हा निधी त्यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम