अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022Maharashtra News :-राज्यात सर्वत्र काल एकच चर्चेचा विषय बनला होता तो म्हणजे महादेवाचा नंदी दूध व पाणी ग्रहण करून लागला. राज्यातील अनेक ठिकाणाहून याचे व्हिडीओ देखील शेअर करण्यात आले.
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महादेव मंदिरामध्ये नंदी पाणी पीत असल्याच्या अफवेमुळे सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली.
जस जस अफवा पसरत गेली तास तशी काही मंदिरांच्या बाहेर लाबंच लांब रांगा लागल्या होत्या. गाव खेड्यापर्यंत या अफवा पसरल्या गेल्या. यामुळे नंदीला पाणी पाजण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने मंदिराबाहेर यात्रेचे स्वरूप आले होते.
हा कुठलाही दैवी चमत्कार नाही. पाण्याचा पृष्ठीय ताण व गुरुत्वाकर्षणामुळे पाणी शोषले जाते. यातील कार्यकारण भाव हा वैज्ञानिक आहे. मात्र, ते पाणी मूर्तीच्या पोटात जात नाही.
त्यामुळे नंदीची मूर्ती पाणी पिते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. यात काही लोकांचा स्वार्थ आहे. याला कुणीही बळी पडू नये. असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.