Maharashtra news : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीची साक्षिदार होण्यासाठी तयारी दर्शविणारा माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा अर्थ कोर्टाने मंजूर केला आहे.
त्यामुळे आता देशमुख यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अॅन्टेलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने हा अर्ज केला होता.
उच्च न्यायालयाकडून तो मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या अर्जाला अटी-शर्तींसह सचिन मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे वाझे आता देशमुख यांच्याविरोधात काय साक्ष देणार? त्यामुळे देशमुख अडचणीत येणार का? या बदल्यात वाझे याची सुटका होणार का? की त्यालाही शिक्षा होणार? याकडे लक्ष लागले आहे.