अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
उपाध्यक्ष शिवसेनेकडे राहाणार आहे. दरम्यान या सगळ्यात आज सतरा विश्वस्तांची यादी उच्च न्यायालयात जाहीर होण्याची दाट शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे.
देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला होता.
मात्र काल महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला शिर्डी संस्थान आले आहे तर काँग्रेसकडे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट.
त्यामुळे उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती आज होणार आहे.
यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष वगळता तिनही पक्षांचे प्रत्येकी पाच सदस्य असणार असून अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित कदम, अनुराधा आदिक, पांडुरंग अभंग, संग्राम कोते,
संदीप वर्पे यांची नावे अग्रस्थानी आहेत तर शिवसेनेकडून रवींद्र मिर्लेकर, संगीता चव्हाण, संजय दुसाणे, रावसाहेब खेवरे आदी नावे चर्चेत आहे. काँग्रेसचे डॉ.एकनाथ गोंदकर, सत्यजित तांबे, करण ससाणे आदी नेत्यांची नावे आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम