अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयातील कर्मचारी तथा राहाता तालुक्यातील आडगाव येथील युवक शेखर दिलीप शेळके (वय ३१) याने पिंपरी निर्मळ येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
सोमवारी दुपारी स्थानिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी लोणी पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलीस दाखल होताच यांनी झाडाला लटकलेला मृतदेह खाली घेऊन पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
मृत शेखर शेळके हा साईबाबा रुग्णालय शिर्डी येथे सेवेत होता. रविवार रात्री कामासाठी म्हणून तो घराबाहेर पडला होता. घटनेची माहिती मिळताच संस्थान कर्मचारी,आडगाव पिंपरी निर्मळ ग्रामस्थ, नातेवाईक यांची मोठी गर्दी जमली होती.
त्याच्या पाठीमागे आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे . त्यानी आत्महत्या का केली याबाबत नेमके कारण समजले नाही. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या सह पोलीस कर्मचारी फटांगरे पुढील तपास करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|