Maharashtra news : राज्यसभेचे माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
आता १२ मे रोजी पुण्यात पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले आहे.फडणवीस यांच्या भेटीसंबंधी संभाजीराजे म्हणाले की, २०१४ मध्ये मला खासदार करण्यासाठी ज्यांनी मला संधी दिली होती, त्यामध्ये फडणवीस यांचा मोठा वाटा होता.

नरेंद्र मोदींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. माझ्या नियतीप्रमाणे एखाद्याने संधी दिली तर त्यांचे आभार व्यक्त करावेत, त्यासाठीच मी फडणवीसांना थँक्यू म्हणण्यासाठी इथे आलो.
माझ्या पुढच्या राजकीय जीवनाचा निर्णय मी १२ मे रोजी जाहीर करेन. ही घोषणा पुण्यातून केली जाणार आहे. त्यामुळे आता १२ तारखेला ते काय भूमिका जाहीर करणार, याकडे लक्ष लागले आहे.













