Samsung Galaxy F70e : आघाडीची टेक कंपनी सॅमसंगने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F70e 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन खास करून कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे.
नवीन Galaxy F70 सीरिजअंतर्गत लाँच झालेला हा फोन 13 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असून, लवकरच तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy F70e 5G च्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास, भारतात या फोनचा 4GB RAM + 128GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिअंट 12,999 रुपये किमतीत उपलब्ध आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ग्राहक फ्लिपकार्ट तसेच सॅमसंग ऑनलाइन स्टोअरवरून तो खरेदी करू शकतील. हा फोन LimeLight Green आणि SpotLight Blue या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर
Samsung Galaxy F70e 5G मध्ये 6.7-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. फोनमध्ये Android 16 आधारित One UI 8 देण्यात आले असून, सॅमसंगने या डिव्हाईससाठी 6 वर्षांचे OS अपग्रेड आणि सिक्युरिटी अपडेट्स देण्याचा दावा केला आहे, जे या बजेट सेगमेंटमध्ये मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.
परफॉर्मन्स आणि कॅमेरा
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2.4GHz पर्यंत क्लॉक स्पीड ऑफर करतो. AnTuTu बेंचमार्कवर या फोनने सुमारे 6.23 लाख पॉइंट्स मिळवले आहेत. ग्राफिक्ससाठी ARM Mali G57 GPU, LPDDR4x RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
Samsung Galaxy F70e 5G मध्ये 6,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरते. एकूणच, दमदार बॅटरी, 5G सपोर्ट, दीर्घकालीन अपडेट्स आणि बजेट किंमत यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.













