Samsung Galaxy S23 Ultra लवकरच येणार ! तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह…

Ahmednagarlive24 office
Published:

लवकरच सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. आम्ही येथे Samsung Galaxy S23 Ultra बद्दल बोलत आहोत.

Samsung Galaxy S22 Ultra काही महिन्यांपूर्वी लॉन्च झाला होता आणि आता कोरियन कंपनी Samsung Galaxy S23 Ultra वर काम करत आहे.

मात्र, लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण असे बोलले जात आहे की कंपनी हा दमदार स्मार्टफोन पुढच्या वर्षी सादर करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा उत्तम परफॉर्मन्स, डिझाईन आणि कॅमेरासह बाजारात उतरेल. याचा कॅमेरा Samsung Galaxy S22 Ultra पेक्षा खूपच चांगला असेल.

रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन 200 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह येत आहे. त्याच वेळी, Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे.

दुसरीकडे, स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन फास्टर फिंगर प्रिंट सेन्सरसह येईल. याआधीही Xiaomi आणि Motorola ने त्यांचे 200 मेगापिक्सलचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

आता सॅमसंगची पाळी आहे. सॅमसंग दोन्ही कंपन्यांना टक्कर देऊ शकते. 200 मेगापिक्सेल कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनच्या शर्यतीत सॅमसंगचे हे पहिलेच उत्पादन असले तरी,

याच्या लॉन्चचा बाजारावर मोठा परिणाम होणार आहे. आतापर्यंत Samsung Galaxy S23 Ultra च्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe