Samsung Galaxy S23 Ultra : काय सांगता! DSLR ला ही मागे टाकतो सॅमसंगचा 200MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन, किंमत आहे…

Published on -

Samsung Galaxy S23 Ultra : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन धुमाकूळ घालत आहेत. अनेक आघाडीच्या कंपन्या आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. अशातच आता भारतातील आघडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कंपनीने 200MP कॅमेरा दिला आहे. त्यामुळे हा फोन DSLR जबरदस्त टक्कर देत आहे. इतकेच नाही तर हा स्मार्टफोन इतर कंपन्यांना टक्कर देईल. फोन जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येणार आहे.

आगामी फोन तयार करणार दहशत

कंपनीकडून नुकतीच आपली फ्लॅगशिप सीरीज Galaxy S23 लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत – Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra. या सीरीजमधील सर्वात शक्तिशाली फोन हा Galaxy S23 Ultra आहे, यात 200MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. एका जबरदस्त लुकसह हा फोन बाजारात आला आहे.

मिळत आहे उत्तम सूट

कंपनीचा हा नवीन फोन जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह बाजारात दाखल झाला आहे. या स्मार्टफोनला पॉवर करण्यासाठी, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. कारण सध्या हा फोन विक्रीसाठी आला नाही, परंतु, त्यावर सवलत जाहीर केली आहे. कंपनीचा हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 8000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध करण्यात आला आहे.

जाणून घ्या बँक ऑफर

यावर बँक ऑफर उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्याकडे HDFC बँक, SBI किंवा ICICI बँक कार्ड असावे. या बँकांच्या कार्डवर 8,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह व्हेरिएंटवर उपलब्ध असणार आहे.

जाणून घ्या कॅमेरा आणि बॅटरी डिटेल्स

Samsung S23 Ultra चा कॅमेरा खूप शक्तिशाली आहे. क्वाड रिअर कॅमेरा सेटअप असणारा Samsung S23 Ultra मध्ये उपलब्ध आहे, ज्याची मुख्य लेन्स 200MP आहे. तसेच यात 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 10MP टेलिफोटो लेन्समध्ये उपलब्ध असणार आहेत. फोनच्या फ्रंटमध्ये कंपनीकडून 12MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी प्रदान केली गेली असून जी वायरलेस आणि जलद चार्जिंगला समर्थन देत आहे. हा फोन एस-पेन सपोर्टसह येत असून त्या तो डिव्हाइससोबतच उपलब्ध असणार आहे.

किती आहे किंमत

या फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 1,24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येत आहे. इतकेच नाही तर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून 1,16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News