Samsung Galaxy S24 Series : लवकरच सॅमसंगचे पॉवरफुल फोन मार्केटमध्ये होणार लाँच, होऊ शकतील हे मोठे बदल; डिटेल्स झाले लीक

Ahmednagarlive24 office
Published:

Samsung Galaxy S24 Series : भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपली नवीन Galaxy S23 सिरीज नुकतीच लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने Galaxy S23, Galaxy S23 + आणि Galaxy S23 Ultra हे तीन स्मार्टफोन एकाच वेळी लॉन्च केले आहेत.

अशातच आता कंपनी आपली नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्याचा तयारीत आहे. परंतु ही सिरीज लाँच होण्यापूर्वी तिचे डिटेल्स लीक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये कंपनी महत्त्वाचे बदल करणार आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर माहिती.

आता Galaxy S23 ही सिरीज लॉन्च होऊन जवळपास दोन महिने उलटले असून त्याच्या पुढील सिरीजची माहिती लीक झाली आहे. Galaxy S23 सिरीजनंतर आता कंपनीच्या आगामी Galaxy S24 सिरीजचे तपशील लीक झाले आहेत, ज्यात आता रॅम आणि प्रोसेसर बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डिस्प्ले, रॅम आणि स्टोरेजमध्ये होणार महत्त्वाचे बदल

टिपस्टर तरुण वत्सने त्याच्या ट्विटरवर Galaxy S24 चे तपशील शेअर केले असून आता यानुसार, Samsung Galaxy S24 आणि Samsung Galaxy S24 Plus मध्ये 12GB रॅम मिळू शकते. हे लक्षात घ्या की आत्तापर्यंत गॅलेक्सी अल्ट्रा मॉडेलमध्ये फक्त 12 जीबी रॅम उपलब्ध आहे.

तसेच, टिपस्टरकडून असेही सांगण्यात आले आहे की Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 16GB रॅम मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी S24 आणि Samsung Galaxy S24 Plus मध्ये 256GB इंटरनल स्टोरेजचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्याच्या डिस्प्लेबद्दल सांगायचे झाले तर या नवीन फोनमध्ये 144hz सपोर्टिंग डिस्प्ले मिळू शकतो.

इन-हाउस मेड चिपसेट मिळण्याची शक्यता

कोरियन टिपस्टरच्या मते, आगामी Galaxy S24 मध्ये इन-हाउस मेड Exynos 2400 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, त्यामुळे हे सर्व बदल फोनमध्ये होणार आहेत की नाही हे सांगणे अवघड आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe