Cyber Alert : देशभरात अनेकजण Samsung, Oppo, Vivo आणि Xiaomi या दिग्ग्ज कंपन्यांचे स्मार्टफोन वापरत असतील. परंतु आता या स्मार्टफोनमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सरकारी एजन्सीने एक इशारा जारी केला आहे.
जर तुमच्याकडेही या कंपन्यांचे स्मार्टफोन असतील तर वेळीच सावध व्हा. नाहीतर याचा हॅकर्स आणि स्कॅमर्सने फायदा घेतला तर तुमच्या बँक खात्यातील पैसे काही मिनिटांतच गायब होतील. तसेच तुमची खासगी माहितीही चोरली जाऊ शकते.

गुगल आपले Android OS सुरक्षित रहावे यासाठी सतत सुरक्षा अपडेट जारी करत असते, जुन्या आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सॉफ्टवेअरमधील खूप त्रुटी अजूनही आहेत. सरकारने अशाच त्रुटींशी निगडित एक चेतावणी जारी केली असून याचा फायदा हॅकर्स आणि स्कॅमर्स घेऊ शकतात. यामुळे वापरकर्त्यांचा संवेदनशील डेटा सहज चोरला जाऊन नुकसान होऊ शकते.
त्यामुळे सरकराने दिला इशारा
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत काम करत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), ने Android OS मधील अनेक असुरक्षा निदर्शनास आणल्या आहेत ज्यामुळे स्थानिक हल्लेखोर वापरकर्त्यांना केंद्रित करून त्यांच्या उपकरणांमधून डेटा चोरू शकतात आणि सेवा-नकाराचे हल्ले करू शकतात. या त्रुटींमुळे Android 10, 11, 12, 12L आणि 13 वापरकर्ते प्रभावित झाले आहेत समोर आले आहे.
फ्रेमवर्क आणि हार्डवेअरमध्येही दिसून आल्या समस्या
याबाबत एका सरकारी एजन्सीने असे म्हटले आहे की Android OS च्या फ्रेमवर्क, मीडिया फ्रेमवर्क आणि सिस्टम घटकांशिवाय, दोष Google Play सिस्टम अपडेट, कर्नल, मीडियाटेक घटक, Unisock घटक, Qualcomm घटक आणि Qualcomm क्लोज-सोर्स घटकांमध्ये उपस्थित आहेत. याचा फायदा हॅकर्स किंवा हल्लेखोर घेऊ शकतात. त्यामुळे ते सहजपणे वापरकर्त्यांना त्रास देऊन त्यांची बँक खाती रिकामे करू शकतात.
करा हे काम
CERT-In ने हे स्पष्ट केले आहे की वापरकर्त्यांनी स्वतःला या त्रुटींपासून सुरक्षित ठेवावे लागेल. त्यासाठी त्यांना त्यांचे डिव्हाइस तात्काळ नवीनतम सॉफ्टवेअर आवृत्तीवर अपडेट करावे लागेल. तसेच या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले सर्व अॅप्सही अपडेट करा. सुरक्षा अपडेटमध्ये विकासक आणि Google द्वारे बहुतेक त्रुटी निश्चित केल्या आहेत.