Samsung Smartphone : Galaxy A54 5G की Galaxy A34 5G कोणता फोन आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम? जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Samsung Smartphone : सॅमसंग सतत आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. नुकतेच या कंपनीने आपले दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G लाँच केले आहे. हे मध्यम श्रेणीचे स्मार्टफोन म्हणून सादर केले आहेत.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने एकापेक्षा एक असे जबरदस्त फीचर्स दिली आहेत. या नवीन फोनमध्ये कंपनीने 5,000mAh बॅटरी दिली आहे. त्यामुळे अनेकांना यापैकी कोणता फोन घ्यावा असा सवाल पडत आहे. जर तुम्हीही गोंधळून गेला असाल तर बातमी सविस्तर वाचा.

काय आहे किंमत?

Samsung Galaxy A54 5G अप्रतिम व्हायलेट आणि अप्रतिम ग्रेफाइट रंगांमध्ये खरेदी केला जात आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये असून हे लक्षात ठेवा की ही किंमत 8 GB रॅम सह 128 GB स्टोरेज मॉडेलची असणार आहे. तर Galaxy A54 च्या 8 GB रॅम सह 256 GB स्टोरेजची किंमत 40,999 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy A34 5G या फोन ग्रेफाइट, लाइम आणि सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये खरेदी करण्यात येत आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येत आहे. 128 जीबी स्टोरेजसह 8 जीबी रॅमची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. तसेच 256 जीबी स्टोरेजसह 8 जीबी रॅमची किंमत 32,999 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy A54 5G vs Galaxy A34 5G चे पहा स्पेसिफिकेशन

कंपनीने आपल्या Galaxy A54 5G मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येत आहे. या डिस्प्लेसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 साठी समर्थन आहे. तर सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Android 13 आधारित One UI 5.1 Samsung Galaxy A54 5G सह उपलब्ध असून ते 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह समर्थित आहे.

कंपनीचा Samsung Galaxy A34 5G देखील Android 13 आधारित One UI 5.1 सह सादर केला असून यात मोठा 6.6-इंचाचा फुलएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येत आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Galaxy A34 5G सह 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज दिले आहे.

कसा असणार कॅमेरा

Galaxy A54 5G सह ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध असून या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 5-मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS प्राथमिक कॅमेरासह समर्थित असणार आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

तर Samsung Galaxy A34 5G सह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सेल, दुय्यम कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि तिसरा लेन्स 5 मेगापिक्सेल मॅक्रो असून या फोन सह OIS देखील समर्थित असणार आहे. यात सेल्फीसाठी 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

जाणून घ्या बॅटरी

Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G 5,000mAh बॅटरी ही 25W जलद चार्जिंगसह उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही फोनच्या बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध नाही. या दोन्ही फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS/ A-GPS, GPS, Glonass, Beidou, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe