Samsung Smartphone Offer : सॅमसंगची अप्रतिम ऑफर! 5G स्मार्टफोनवर मिळेल 39 हजारांची सवलत, जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Smartphone Offer

Samsung Smartphone Offer : सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. मागणी जास्त असल्याने या फोनच्या किमती जास्त आहेत. सॅमसंगने आपला Samsung Galaxy S22 5G हा फोन काही दिवसांपूर्वी लाँच केला होता.

त्यावर आता तुम्हाला 39 हजार रुपयांची सूट मिळत आहे. सॅमसंगच्या वेबसाइटवर ही ऑफर मिळत आहे. या फोनची किंमत 66,999 रुपये असून कंपनी या फोनवर 31 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. त्यामुळे आजच संधीचा लाभ घ्या.

तसेच HDFC बँक कार्डधारकांना या स्मार्टफोनवर 8,000 रुपयांची झटपट सवलतही मिळेल. या दोन्ही ऑफरसह, स्मार्टफोनवर उपलब्ध एकूण सवलत 39 हजार रुपयांपर्यंत जात आहे. तर सॅमसंग अॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांना 10% कॅशबॅक देखील उपलब्ध करून दिला आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीचा हा 5G स्मार्टफोन अनेक उत्तम फीचर्सनी सुसज्ज असून यात तुम्हाला 6.1 इंच फुल एचडी डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले पाहायला मिळेल. फोनचा हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. यात प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत असून स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप देखील उत्तम आहे.

यात तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे मिळेल. तसेच यामध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 10-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

हा कंपनीचा फोन 3700mAh बॅटरीसह येत असून ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर कंपनी या स्मार्टफोनमध्ये 15 वॉट वायरलेस चार्जिंग देखील देत असून OS बद्दल सांगायचे झाले तर, फोन Android 12 वर आधारित One UI वर काम करतो. हा फोन तुम्हाला फँटम ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe