Samsung Smartphone Offer : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी की शानदार ऑफर आहे. कारण आता तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा खूप कमी किमतीत Samsung चे जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता.
लवकरच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलला सुरवात होणार आहेत. या कालावधीत कंपनीचे अनेक डिव्हाइस कमी किमतीत उपलब्ध असतील. अशातच आता कंपनीनेच अशी घोषणा केली आहे की ग्राहकांना त्यांचे एफ-सिरीज आणि एम-सिरीज डिव्हाइसेस 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. तुम्ही ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म शिवाय, ऑफलाइन स्टोअरमध्ये विशेष किमतीत खरेदी करू शकता.
मिळेल विशेष सवलत
तुम्ही हे 6,499 रुपयांच्या विशेष किमतीत Samsung Galaxy M04 आणि Galaxy F04 स्मार्टफोन खरेदी करू शकता. ग्राहकांना Samsung Galaxy M13 आणि Galaxy F13 9,199 रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी करता येतील. तुम्ही ते कंपनीच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सशिवाय, Galaxy M04 आणि Galaxy M13 Amazon वरून खरेदी करू शकता. तर त्याच वेळी, इतर दोन फोन कंपनीच्या वेबसाइट्स आणि रिटेल स्टोअर्सशिवाय, फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.
जाणून घ्या Galaxy M04 आणि Galaxy F04 चे फीचर्स
तुम्हाला कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स असणारा फोन हवा असल्यास तुम्ही Galaxy M04 खरेदी करू शकता. या फोनमध्ये रॅम प्लस फीचरसह 8GB रॅमचा फायदा मिळेल. शिवाय या डिव्हाइसमध्ये उपलब्ध 128GB स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून Galaxy F04 हा फोन एका स्टायलिश डिझाइनसह येतो. त्यात 8GB रॅमसह रॅम प्लस वैशिष्ट्य, शक्तिशाली 5000mAh बॅटरी, फेस अनलॉकसह दोन प्रमुख OS अपग्रेड यांसारखी शानदार फीचर्स देण्यात आली आहेत.
Galaxy M13 आणि Galaxy F13 चे फीचर्स
कंपनीच्या Galaxy M13 मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. शक्तिशाली फोटोग्राफी अनुभवासाठी फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. Galaxy F13 मध्ये, वापरकर्त्यांना फुल एचडी डिस्प्ले आणि 60000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. 50MP ट्रिपल कॅमेरा सारखी फीचर्स दिले असून हे दोन्ही उपकरणे मजबूत बजेट पर्याय आहेत. तुमची तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार कोणताही फोन खरेदी करू शकता.